बीएसएनएलची केबल चोरीला,डोंबिवली एम्आयडीसी व कल्याण पूर्वची सेवा ठप्प.
(श्रीराम कांदु)
भारत संचार निगम लिमिटेडची डोंबिवली पूर्व विक्को नाक्या समोरील नाल्यातुन अज्ञात चोरांनी केबल कापून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. यामूळे शुक्रवार रात्री पासून डोंबिवली एमआयडीसी व कल्याण पूर्व ची बीएसएनएल सेवा ठप्प झाली आहे.जी सोमवार पर्यंत सुरु होण्याचे आश्वाशन बीएसएनएल कर्मचार्यानी दिले आहे.या चोरी प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
एमआयडीसीच्या विक्को कंपनी समोरच नाल्याचे निर्माणकार्य चालु होते. २६ जानेवारीला सायंकाळी खोद्लेल्या ठिकाणी टेलीफोन केबल उघडी राहीली होती. सकाळी ही केबल तुटलेली होती . या केबलच्या चोरीमुळे डोंबिवली एमआयडीसी कल्याण पूर्व व गोळवली, पिसवली या गावात टेलीफोन व इंटरनेट सेवा पूर्ण बंद होती. एका दूरसंचार कर्मचार्याने दिलेल्या माहिती नुसार ही सेवा सोमवार पर्यंत दुबारा सुरू होईल.