बिल्वदल नागरिकांचा 4 वर्षे लढा

(श्रीराम कांदु)
बील्वदल ही इमारत 9 ऑगस्ट 2014 रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील 48 कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे रहिवाश्यांनी इमारत तातडीने रिकामी केली. या घटनेला  4 वर्षे पूर्ण झाले. एकीकडे या इमारतीच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने कोणतीही हालचाल झालेली नाही. तर दुसरीकडे सदर इमारतीच्या रिकाम्या जागेवर भंगारवाल्यांनी कब्जा केला असून मालकानेही बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय सुरू केला आहे. रडकथा ऐकण्यास प्रशासन मात्र असमर्थ ठरले  आहे
. या इमारतीतील रहिवासी असलेले शिवसैनिक संजय मांजरेकर हे  स्थानिक प्रशासनापासून अगदी शासनापर्यंत आतापर्यंत अनेक पत्रव्यवहार केले आहेत. मुख्यमंत्र्यांना तर तब्बल 120 वेळा पत्रव्यवहार केला. मात्र महापालिकेसह शासनाकडूनही काहीही हालचाली झाल्या नाहीत. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांचेही पत्रांद्वारे लक्ष वेधले असले तरी त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही.
 सहा आयुक्त आले आणि गेले असले तरी बिल्वदलवासीयांच्या हाती काहीही आले नाही. इमारतीची एकूण जागा 6 हजार 534 स्क्वेअरफूट इतकी आहे. सदर जागेवर 2 विंग असलेल्या इमारतीत एकूण 48 रहिवासी वास्तव्य करत होते. आम्हाला बेघर किती दिवस ठेवणार, असा सवाल करत सरकारने आम्हाला एफएसआय वाढवून द्यावा, अशी मागणी या रहिवाश्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर पत्रामार्फत केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे बिल्वदलवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

👉बिल्वदलच्या रिकाम्या जागेवर भंगारवाल्यांचा कब्जा :

इमारतीच्या रिकाम्या जागेवर मालक रेती, खडी, विटांचा व्यवसाय करत आहेत. तसेच डंपर त्या जागेत आणून उभे करत आहेत. तसेच भंगारवाल्यांना ही जागा भाड्याने वापरण्यास देऊन स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. या अगोदर दोन वेळा पालिकेच्या नगररचना विभागाने त्यांना पत्र देऊन प्लॅन टाकण्यास व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र मालकाने याबाबत उदासीन भूमिका घेऊन सदर जागेवर स्वतःचा व्यावसाय सुरू केल्याचेही मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात बिल्वदलवासियांनी म्हटले आहे.
—-
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email