बिबट्याच्या भीतीने चामटोली गावकरी त्रस्त

बदलापूर – बदलापूर नजीक असलेल्या चामटोली गावाच्या परिसरात बिबट्याने २ बकऱ्या फस्त करत एका बकरीच्या मानेवर पंजा मारून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.यामुळे चामटोली परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बदलापूर येथून २ किमीच्या अंतरावर चामटोली हे गाव आहे. तेथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडण्याची मागणी केली आहे. बदलापूरच्या आसपास चंदेरी डोंगराच्या पायथ्याशी असणा-या तानवाडी आणि चामटोली गावाच्या हद्दीत हा बिबट्या अनेकांना दिसल्याची चर्चा गेल्या काही काळापासून होत आहे. परंतु प्रत्यक्ष कुणी पाहिल्याचे सांगितले नसल्याने याबबात संभ्रमाचे वातावरण होते. दोन दिवसांपूर्वी चामटोली गावाजवळील योगेश इरमाळी यांच्या जंगलात चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्या परत न आल्याने ते सायंकाळी बकऱ्यांचा शोध घेण्यासाठी माळरानावर गेले तेव्हा त्यांना बिबट्या बकरी खाताना दिसला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती वनविभागाला दिली. त्याच जागेवर सकाळी बकरी मृत अवस्थेत वनविभागाला आढळून आली. मात्र पायाचे ठसे न मिळाल्याने वनविभागाचे गार्ड आणि अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email