बिबट्याची कातडी विकायला आलेले त्रिकुट गजाआड

उल्हासनगर-बिबट्याची कातडी विकायला आलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद पवार,अनिल खैरनार,राकेश निकम अशी या तिघांची नावे आहेत.सदर इसम बिबट्याचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार सापळा रचून या त्रिकुटाला अटक करण्यात आली.या आरोपिंकडे बिबट्याची कातडी सापडली असून त्याची किंमत सुमारे १० लाख रूपये आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्हे शाखेचे प्रमुख स.पो.नि.उरद्दीन शेख,युवराज मागुडे,पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरमल,रामसिंग चव्हाण,सुरेश पवार,यांनी सदर करवाई केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email