‘बिग बाॅस 11’फेम हिना खानकडचे 11 लाखांचे दागिने गेले कुठे?

मुंबई – बिग बॉसच्या ११व्या सीझनची उपविजेती हिना खान हिने एका पुरस्कार सोहळ्यात घालण्यासाठी दागिने घेतले होते. मात्र तिनं अजूनही दागिने परत केले नाही असा आरोप ज्वेलर्सनं केला आहे. तिच्याकडे वारंवार दागिन्यांची मागणी करूनही तिनं ते परत केले नाही. हे दागिने आपल्या स्टाईलिस्टकडून हरवले असही हिनानं सांगितलं. ११ लाखांचे दागिने परत केले नसल्याने या ज्वेलरने तिच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केलीय. एका पुरस्कार सोहळ्यात घालण्यासाठी तिने हे दागिने घेतले होते. मात्र कार्यक्रमानंतर हे दागिने आपल्या स्टायलिस्टने हरवल्याचं हिनाने सांगितलंय. अखेर या ज्वेलरने तिच्याकडे दोन लाखांच्या नुकसानभरपाईची मागणी केलीय. मात्र हिनाने ही रक्कम द्यायला ठाम नकार दिलाय. हे दागिने कायमस्वरूपी विसरून जा नाहीतर परिमाण वाईट होतील अशाही धमक्या हिनानं दिल्याचा आरोप ज्वेलर्सनं केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.