बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंती निमित्‍त महापौर बाल चित्रकला स्‍पर्धा संपन

कल्‍याण  – कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका आणि पुसामा यांचे संयुक्‍त विद्यमाने आजदि२३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंती निमित्‍त महापौर बाल चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन सकाळी ८०० वा प्रबोधन कार ठाकरे सरोवर काळा तलाव येथे मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी महापौर राजेंद्र देवळेकरअनघा देवळेकरगटनेता रमेश जाधवशिक्षण समिती सभापती वैजयंती गुजरघोलपस्‍थानिक नगरसेवक सुधीर बासरेमाजी नगरसेवक सचिन बासरेश्रेयस समेळअध्‍यक्ष पुसामा मिलींद कुलकर्णी भरत मलिकमेघन गुप्‍तेविस्‍तार अधिकारी विजय सरकटे महापालिका सचिव संजय जाधव आदि उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्‍मारकावर महापौर राजेंद्र देवळेकरगटनेते रमेश जाधवशिक्षण सभापती वैजयंती गुजरघोलपआदि मान्‍यवरांनी पूष्‍पहार अर्पण करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

महापौर बाल चित्रकला स्‍पर्धेला महापालिका क्षेत्रातील २५४ शाळांमधील एकुण ५८०० विदयार्थ्‍यांनी या स्‍पर्धेत सहभाग घेतला होताप्रबोधनकार ठाकरे सरोवरालगत असलेल्‍या नयनरम्‍य वातावरणात विदयार्थ्‍यांनी मोठया उत्‍साहाने या स्‍पर्धेत आपला सहभाग नोंदवीला तसेच मोहने येथील चित्रकार अनिल गोवळकर यांनी बाळासाहेबांचे लाईव्‍ह तैलचित्र काढुन सर्वांना अचंबित केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email