बाळासाहेबांनी मला असले घाणेरडे राजकारण शिकवले नाही– .राज ठाकरे
उद्धव आणि त्यांच्या सहकाऱ्याने गलीच्छ राजकारण केले–राज ठाकरे
मी ६ नगरसेवक शिवसेनेत पाठविले नाहीत .
बाळासाहेबांनी मला असले घाणेरडे राजकारण शिकवले नाही .
बाहेरच्या लोकांना पांच पांच कोटी दिले जातात हे एका शिवसेना नगरसेकानेच काल मला सांगितले .
उद्धव आणि त्यांच्या सहकाऱ्याने गलीच्छ राजकारण केले .
दिड महिन्यापूर्वीच नगरसेवक विकले जाणार हे माहित होते . मग असे विकाऊ नगरसेवकांना रोखण्यात काहीच अर्थ नव्हता .
शिवसेनेची ही फोडाफोडी मी कधीच विसरणार नाही .
शरद पवारांनी फोडाफोडी विषयी बोलु नये .
शिवसेनेला मराठी माणसाचे काही घेणे देणे नाही .
बायकोला सोडेन पण तुम्हाला सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी पांच कोटी घेऊन मनसे सोडली !
. . . मुंबई महापालिकेतील ६ मनसे नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत प्रथमच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली