बारावी पास विद्यार्थाना सरकारी कार्यलयात नोकरी कशी मिळाली या करीता मार्गदर्शन शिबीर *
( पूजा उगले )
डोम्बिवली महाराष्ट्र नवनिर्वाण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सागर रविंद्र जेधे यांच्या तर्फे बारावी शिकणारया विद्यार्थानसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आली आहे. १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी १० वाजता आयोजित या मार्गदर्शन शिबिराचे ठिकाण बाल भवन राम नगर डोम्बिवली पूर्व येथे आहे बारावी पास विद्यार्थाना सरकारी कार्यलयात नोकरीची सुवर्णसंधी कशी मिळाव़ी म्हनून या मार्गदर्शन शिबिराचे आयोजित करण्यात येत आहे या शिबिरा मध्ये बारावी पास विद्यार्थानी सरकारी नोकरीसाठी फोम कधी,कुठे व कसा भरावा, परीक्षा केंद्र कसे निवडावे, लेखी परीक्षेचा अभ्यास कसा करावा याची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. शिबिरात बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा घेण्यात येईल. केंद्र सरकारची क्लेरिकल जागाची भरती चालू होत आहे, या परीक्षेत उतीर्ण होण्याकरीता आवश्क सर्व माहित शिबिरात देण्यात येणार आहे.