बारवी धरण ७० टक्के भरले

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि. १५ – जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, नवी मुंबई, ठाणे, मुंबई शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात समाधानकारक पाऊस झाल्याने बारवी धरण गेल्या वर्षाच्या तुलनेत लवकर भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून 15 जुलै रोजी धरण 70 टक्के भरल्याची माहिती समोर आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास थोड्याच दिवसात धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यताही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

पावसाळ्यात बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून धरण भरण्याची सर्वच वाट पाहत आहते. 15 जुलै रोजी बारवी धरणातील पाण्याची पातळी 64.72 मीटर एवढीपातळी आहे. धरणाची प्रवाह पातळी ६८.६० मीटर आहे. बारवी धरण परिसरात आज दिवसभरात 103 मि.मी. पाऊस पडला. तर परिसरातील ठाकूरवाडी 77 मि.मी., कंहाल 154 मि.मी., खाननिवार १२६ मि.मी., पाटगाव १५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरात आजपर्यंत 1278 मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात धरणात २१५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email