बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी महिला लेझिम पथक सज्ज

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२२ – प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. मंडळाचे महिला लेझिम पथक यंदाच्या वर्षी लक्षवेधी ठरणार आहे. या पथकाचे सलग 10 वे वर्ष आहे. दरवर्षी आपल्या वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार साठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळातर्फे आत्तापर्यंत लेझिम, झांज, ढाल-तलवार, झेंडा, हलगी पथके सादर केली आहेत यंदा 28 महिलांच्या लेझिम पथकासह सज्ज असलेल्या या पथकाची प्रमुख सिद्धी वैद्य, चिटणीस एम ए इन सायकॉलॉजी असून स्वतःचा व्यवसाय सांभाळून इतर महिलांची प्रॅक्टिस घेते.

डोंबिवलीमधील यशराज कला मंचचे प्रमुख शाहीर विवेक ताम्हनकर हे गेली दहा वर्षे या पथकासाठी मार्गदर्शन करीत आहेत. दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन श्री ताम्हनकर या पथकाला मार्गदर्शन करत असतात. या 38 महिलांच्या पथकात अगदी इयत्ता दुसरी पासून ते साठी पार केलेल्या महिलांचा समावेश आहे. या महिला आपली दिनचर्या, व्यवसाय, नोकरी सांभाळून रोज संध्याकाळी होणाऱ्या सरावामध्ये सहभागी होत असतात.

या पथकामध्ये गृहिणींबरोबरच अनेक उच्च शिक्षित महिलांचाही समावेश आहे. गुरूकुल द डे स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कर्यरत असलेली मनाली गोविलकर, इकॉनॉमिक्समध्ये पीएचडी करणारी आणि इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करणारी वृषाली राजवाडे, ऑटोमेशन सोल्युशनमध्ये पार्टनर असणाऱ्या अमिता गोखले, फॉरेन ट्रेडमध्ये काम करणारी सायली पोळ, क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करणारी रश्मी परब ही अशीच काही उदाहरणे.

पथकाचे अजून वैशिष्टय म्हणजे या पथकात आई-मुलगी असे एकत्र नृत्य सादर करणाऱ्या तब्बल सात जोड्या आहेत. सायली आणि काव्या पोळ, रश्मी आणि तनिष्का परब, असावरी आणि चैत्राली भावे, प्रियांका आणि श्रिया भिडे, दीपाली आणि सई पोवळे, प्रिया आणि रिया गोगटे, अमिता आणि मृण्मयी गोखले इत्यादी आणि या सर्वजणी अगदी नित्यनेमाने सरावासाठी उपस्थित असतात. टिळकनगर गणेशोत्सव मंडळाची शान असलेल्या या पथकाच सादरीकरण बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.

Leave a Reply

Your email address will not be published.