बाईक पार्किंगच्या वादातून मारहाण

कल्याण –  सोसायटीची सभा संपल्यानंतर त्या जागेवर बाईक पार्क केल्याने एक इसमाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारी नुसार पोलीसांनी मारहाण करणाऱ्या विकास कुंभारे विरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

    कल्याण पूर्वेकडील लोकधारा संकुलात शिवालिक इमारतीमध्ये  राहणारे उमानाथ मालवणकर आपल्या सोसायटीची सभा संपल्यावर  त्यांनी त्या ठिकाणी  आपली दुचाकी पार्क केली. त्यामुळे  सोसायटीचे सभासद विकास कुंभारे संतापले. त्यांनी मालवणकर यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. दुचाकी पेटवून देण्याची धमकी देत मालवणकर यांना ठोशा बुक्क्यांनी जबर मारहाण केली या मारहाणीत मालवणकर याच्या हाताला गंभीर दुखापत झाली यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या मालवणकर यांच्या पत्नीला देखील कुभारे ने धक्का दिला .या प्रकरणी मालवणकर यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी विलास कुंभारे विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.