बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा राजीनामा,सोमवारी कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

बंगळुरु- बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला.अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं. येडियुरप्पा यांनी 17 मे रोजी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे.  जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. सोमवारी कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणा करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email