बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ; ३ अटक १ फरार
नगर – राहुरी तालुक्यातील केसापूर येथे बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या भावासह मामाच्या तीन मुलांनी अत्याचार केला. यात मुलगी गरोदर राहिल्याने मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की भावाने सन २०११ ते २०१५ या दरम्यान संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे वेळोवेळी अत्याचार केला. तसेच २०१५ ते २२ फेब्रुवारी २०१८ यादरम्यान मामाच्या तीन मुलांनी वेळोवेळी, वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तसेच मामीच्या घरात अत्याचार केला.
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तीला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मुलीने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.यानंतर त्यांनी मुलीला घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून एक पसार झाला आहे.
Please follow and like us: