बहिणीला मारल्याचे खोटे सांगत  चैन लंपास

कल्याण – कल्याण डोंबिवली मध्ये भामट्यांचा वावर वाढला असून या भामट्याकडून  पादचारी नागरिकांना हेरून त्यांना या ना त्या भूलथापा देत त्यांना बोलण्यात गुंतवून त्याच्या जवळील रोकड व किमती ऐवज लंपास करण्याच्या घटना वाढल्या असून या वाढत्या घटना मुले पोलीस यंत्रणा चक्रावली आहे .काल तर एका इसमाला बहिणीला मारल्याचे खोटे सांगत त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळील चैन लंपास केल्याची घटना घडली आहे .
कल्याण कोळशेवाडी म्हसोबा चौक येथे दत्त कॉलनी चाळीत राहणारे रोहन गायकवाड काल दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास बिर्ला कॉलेजच्या गेट जवळ आपल्या मावस भावासह थांबले असताना अचानक एका इसम फोन वर बोलत आला त्याने  त्यांना हटकले व तुम्ही माझ्या बहिणीला मारले आहे मला खात्री करायची आहे तुम्ही माझ्या घराजवळ याबसे सांगत गायकवाड व त्यांच्या भावाला कॉलेज च्या  मागच्या बाजूस असलेल्या मैदानात घेऊन गेला तिथे त्याने गायकवाड यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची चैन घेऊन एका रुमालात ठेवून  दगडा खाली ठेवल्याचे दाखवत हातचलाखीने चैन चोरून तेथून पसार झाला .काही वेळाने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थनाकात तक्रार नोंदवली असून या तक्रारि नुसार पोलिसानी अज्ञात सतीश नावाच्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email