बनावट फेसबुक अकाउंट बनवुन बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

उल्हासनगर : बनावट फेसबुक अकाउंट बनवुन त्याद्वारे एका व्यक्तीची बदनामी केल्या प्रकरणी हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उल्हासनगर अंबीका माता मंदिर परिसरात राहणारे निखिल गोळे यांनी त्यांचे फेसबुक अकाउंट बघीतले असता कट्टर हिंदुत्ववादी या फेसबुक अकाउंटवर काही अश्लील शब्द दिसले.सदर प्रकार पाहून ते चक्रावुन गेले. कट्टर हिंदुत्ववादी या बनावट फेसबुक अकाउंटवरून ते पाठवण्यात आले होते.हे अकाउंट कोणाचे आहे? याबद्दल ते अनभिज्ञ आहेत. अखेर त्यांनी या प्रकरणी हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी 294, 500, 504 या कलमांद्वारे तसेच इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या कलम 56 ,57 नुसार गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक पलंगे पुढील तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email