बनावट कागदपत्र सादर करत बँकेला लाखोंचा गंडा
( श्रीराम कांदु )
कल्याण : घराचे बनावट कागदपत्र बनवून ती बँकेला सादर करत बँकेकडून तब्बल ९५ लाखांचे कर्ज घेतले त्यामधील ११ लाख रक्क अदा केली मात्र उर्वरित रकमेचा भरणा न केल्याने हा धक्क्कादाय्क प्रकार उघडकीस आला आहे .सदर घटना कल्याण पश्चिमेत घडली असून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात संकेत अजित कुमार शहा व कैलाश गुप्ता या दोन जना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जाणे २०१६ रोजी कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका बँकेत अजित कुमार शहा व कैलाश गुप्ता या दोघांनी मुंबई बांद्रा येथील एका इमारती मधील फ्लट चे खरेदीची किमतीचे कागदपत्र बनावट मोहर चा वापर करत बनावट कागदपत्र तयार करत हि बँकेत सादर केली .या कागदपत्रानुसार बँकेने त्याना ९५ लाख कर्ज मंजूर केले कर्ज मिळाल्यानंतर या दोघांनी त्यामधील ११ लाख १३ हजार सहाशे रुपयांचा भरणा देखील केला मात्र त्यानंतर पैसे न भरल्याने चौकशी केली असता कर्जा साठी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले .अखेर बँकेने या प्रकरणी बनावट कागदपत्र सादर करत बँकेची दिशाभूल करत ९५ लाखांचे कर्ज मंजूर करून घेत त्यामधील ८३ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अजित कुमार शहा व कैलाश गुप्ता या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: