बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन राहणारे त्रिकुट गजाआड

कल्याण दि.०१ – बनावट कागद पत्र सादर करत जामीन राहणाऱ्या त्रिकुटाला कल्याण न्यायालयाच्या गेटवरच बनावट दस्तावेजासह पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. वाहिद खान ,आफताब शेख ,योगेश जगताप अशी या भामट्यांची नावे आहेत.

वाहिद खान ,आफताब शेख ,योगेश जगताप हे तिघे अटक आरोपींना कोर्टातून जामीन करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे दस्तवेज तयार करून ते खोटे आहेत हे माहित असून देखील ते खरे दस्तवेज असल्याचे भासवून सुमारे वर्षभरापासून अनेक आरोपीना न्यायालयातून जामीन करून न्यायालयाची फसवणूक केली आहे.

तसेच सोमवारी आरोपीचा जामीन करण्यासाठी हे तिघे पुन्हा बनावट दस्तावेज घेऊन कल्याण न्यायलानिक आले होते. मात्र पोलिसांनी संशय आल्याने त्यांनी या तिघांना हटकले व त्याच्याजवळील कागदपत्रे तपासली असता टी बनावट असल्याचे आढळून आल्याने वाहिद खान ,आफताब शेख ,योगेश जगताप या तिन्ही भामट्याणा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघा विरोधात महात्मा फुले पोलीस स्थानकात वाहिद खान ,आफताब शेख ,योगेश जगताप या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email