बनावट कागतपत्राद्वारे पासपोर्ट : ५ जणांना अटक
श्रीराम कांदू
ठाणे-बनावट कागतपत्र बनवुन पासपोर्ट बनवुन देण्या-या एका एजंटला पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून याप्रकारे पासपोर्ट बनावुन घेणा-या ४ जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्मद रफिक रेहमतुल्ला सय्यद (३९ रा. मुंब्रा),असे या एजंटचे नाव असून तो २० हजार रूपये घेवुन शाळा सोडल्याचा दाखला, घराचे करारपत्र, लग्नाचा दाखला, बँकेचे पासबूक अशी बनावट बनावट कागतपत्रे तयार करुन त्या आधारे पासपोर्ट बनावुन देत असे.याप्रकरणी त्याच्या कडून याप्रकारे पासपोर्ट बनावुन घेणा-या ४ जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद रमजान शेख (३० रा. मुंब्रा), आसिफ अब्बास मिर्झा (४७ रा. मुंब्रा), शबाना शहाबुद्दीन बेपारी (२५ रा. वडाळा) आणि मैमुनिसा सलीम सय्यद (४५ रा. मुंब्रा) अशी या आरोपींची नावे आहेत. मुंब्रा पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेत काम करणारे पोलिस नाईक विनायक गावित यांना याप्रकरणी माहिती मिळाली होती.यानुसार कारवाई करत पोलिसांनी या पाच जणांना अटक केली आहे. सरकारची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.