बदलापुर ग्रामीण पोलीसांतर्फे गुलाब पुष्प प्रदर्शन
श्रीराम कांदू
बदलापुर – बदलापुर ग्रामीण पोलीस ठाण्याला आयएसओ २०१५ दर्जा प्राप्त झाला आहे.यानिमिताने तेथे गुलाब पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.यात १५० विविध जातींची गुलाबाची फुले मांडण्यात आली होती.तसेच यावेळी नेत्रदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला.यावेळी माजी नगराध्यक्ष राम पातकर,शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरी,माजी नगरसेवक मंगेश धुळे,पोलीस उपअधीक्षक राजेन्द्र मोरे, बदलापुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख अविनाश पाटिल व इतर मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व फुले ही वांगणी येथील एका शेतक-याच्या शेतातील आहेत.
Please follow and like us: