बँक खातेदारांच्या खात्यातून अचानक पैसे काढले

डोंबिवली-डोंबिवली शहरातील बँक खातेदारांच्या खात्यातून अचानक पैसे काढल्याचा प्रकार नुकताच घडलायं.एकूण ८ बँक खातेदारांना या प्रकारे गंडा पडला असून खातेदारांनी या संदर्भात पोलिसात धाव घेतली आहे.पाटकर रोड येथील कॅनरा बँकेच्या ७ तर युनियन बँकेच्या एका खात्यातून हे पैसे लंपास झाले आहेत.कॅनरा बँकेच्या ७ खात्यातून सुमारे सव्वादोन लाख तर युनियन बँकेच्या एका महिलेच्या खात्यातून एक लाख रुपये वळते झाल्याचे वृत्त आहे.कॅनरा बँकेच्या खातेदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तर युनियन बँकेच्या खात्याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.एटीएम अथवा नेटबँकिंगद्वारे हा प्रकार घडल्याचा कयास वर्तवला जातोय.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email