फ्लॅटचे आमिष दाखवत बिल्डरने तिघांना लाखोंना गंडवले
डोंबिवली – एका बड्या विकासकाने तीन जणांना फ्लॅट चे आमिष दाखवुन तब्बल ९३ लाख ८२ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याची घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे .या प्रकरणी फसवणूक झालेल्या तिघा जणांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करत लोकग्राम ग्रुप चे विकासक दर्शन गांधी यांच्यासह लोकग्राम ग्रुपच्या संचालका विरोधात गुन्हा करत पुढील तपास सुरु केला आहे .
कल्याण पूर्वेकडील लोकधारा येथील तुंगा सोसायटी मध्ये राहणारे रामाग्या मिश्रा यांना २०१३ साली लोकग्राम ग्रुपचे विकासक दर्शन गांधी यांच्यासह लोकग्राम ग्रुप च्या संचालकानि इमारत बांधून फ्लॅट देतो असे आमिष दाखवले त्यामुळे मिश्रा यांनी त्यांना ३६ लाख ७ हजार ५०० रुपये देवू केले मिश्रा यांच्या सह त्यांनी फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत दिलीप कुमार फुलझेले यांच्याकडून ३० लाख तर मंगेश नलावडे याच्या कडून २७ लाख ७५ हजार रुपये घेतले .मात्र दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटूनही गांधी यांनी इमारत बांधली नाही फ्लॅट ही दिला नाही याबबत विचारणा केली असताना त्यांनी उडवा उद्वी ची उत्तरे दिली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मिश्रा यांनि या प्रकरणी लोकग्राम ग्रुप मध्ये लोकग्राम ग्रुप चे विकासक दर्शन गांधी यांच्यासह लोकग्राम ग्रुप च्या संचालका विरोधात कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी लोकग्राम ग्रुप चे विकासक दर्शन गांधी यांच्यासह लोकग्राम ग्रुप च्या संचालका विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .