फ्रेंड्स स्वावलंबन केंद्र आयोजित आगळयावेगळया प्रदर्शनाची सुरवात
फ्रेंड्स स्वावलंबन केंद्रातर्फे एका आगळयावेगळया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.कालपासून या प्रदर्शनाची असून ते २२ मार्च पर्यन्त संपन्न होणार आहे.३५ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे व्यंकटेश पै यांनी बालपणापासून म्हणजेच सुमारे ५० वर्षे सतत संग्रहित केलेल्या अनेक दुर्मिळ वस्तु येथे दर्शकांना पहावयास मिळत आहेत.
प्रा.व्यंकटेश पै यांनी त्यांच्या फ्रेंड्स स्वावलंबन केंद्रातर्फे या प्राचीन वस्तूंचा संग्रह करून जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.पै यांना जुने स्टॅम्प,नाणी,प्राचीन वस्तू संग्रह करण्याचा लहानपणापासून छंद आहे. याच बरोबर त्यांची तांबा ,पितळ ,लोखंडाची दुर्मिळ अशी पूजेच्या वस्तू यांचा संग्रह तसेच निरनिराळी जेवणासाठी,पाणी साठवून ठेवण्यासाठी अशा भांड्यांचा उपयोग होत असे .अशा भांड्यांचा संग्रह केला आहे .त्याची सर्वांना माहिती व्हावी म्हणून त्यांनी या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरविले आहे.हे प्रदर्शन विनामुल्य असून या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी यात बऱ्याच वस्तू विक्रीसाठीही उपलब्ध आहेत याचाही लाभ घेता येईल. तरी सर्वानी या प्रदर्शनात येण्याचे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वावलंबन केंद्राचे विद्यार्थी कापडी पिशव्या शिवतात व ना नफा व ना तोटा या तत्वावर विकतात. वरील प्रदर्शनात कापडी पिशव्यांचे प्रदर्शन व विक्री होत आहे. तरी कृपया सर्वानी या कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करावी असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.फ्रेंड्स स्वावलंबन केंद्र ,श्री शिवप्रसाद सोसायटी ,डाँ.राजेंद्रप्रसाद रोड ,टिळकनगर, अमृत हॉस्पिटल जवळ ,डोंबिवली (पूर्व ) येथे सदर प्रदर्शन व विक्री दिनांक ११ मार्च पासून सुरु झालेले हे प्रदर्शन २२ मार्च पर्यंत सकाळी १०.०० ते १.०० व संध्याकाळी ५.०० ते ९.०० या वेळेत संपन्न होणार आहे. आहे.अधिक माहितीसाठी ९८६९९२१३१७/९९३०८९५६२५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन रोहित पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.