फ्रेंड्स स्वावलंबन केंद्रातर्फे प्राचीन तांबे,पितळ इत्यादी वस्तूंचे संरक्षण,प्रदर्शन व विक्री
डोंबिवली – अगदी अलिकडे ३०-४० वर्षांपूर्वी तांबा,पितळेची विविध प्रकारची भांडी स्वयंपाकासाठी,पूजेसाठी अशी वापरात होती.लग्नात आहेर म्हणून अशी भांडी दिली जात होती.जुन्या काळात या भांडयाना खूप महत्त्व होते पण नंतर नव्या पिढीने या भांडयांची घ्यावी लागणारी निगा आणि जागेअभावी या वस्तू वापराणे बंद केले.वास्तविक पाहता अशा वस्तू आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे या भांडयांच्या वापरामुळे होणारे फायदे समजून घेणे गरजेचे आहे. अशा भांड्यांच्या वापरामुळे डाॅक्टरांकडे जाण्यापासून आपला अर्धा खर्च कमी होऊ शकतो.खूप लोकांना याचा विसर पडलेला आहे. नवीन पिढीला याची माहिती करून देणे आवश्यक आहे.
या संदर्भात प्रा.व्यंकटेश पै यांनी त्यांच्या फ्रेंड्स स्वावलंबन केंद्रातर्फे या प्राचीन वस्तूंचा संग्रह करून जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.पै यांना जुने स्टॅम्प,नाणी,प्राचीन वस्तू संग्रह करण्याचा लहानपणापासून छंद आहे. याच बरोबर त्यांची तांबा ,पितळ ,लोखंडाची दुर्मिळ अशी पूजेची वस्तू यांचा संग्रह तसेच निरनिराळी जेवणासाठी,पाणी साठवून ठेवण्यासाठी अशा भांड्यांचा उपयोग होत असे .अशा भांड्यांचा संग्रह केला आहे .त्याची सर्वांना माहिती व्हावी म्हणून त्यांनी या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आहे.तरी या प्रदर्शनाला सर्व नागरिकांना भेट द्यावी यात बऱ्याच वस्तू विक्रीसाठीही उपलब्ध आहेत याचाही लाभ घेता येईल. तरी सर्वानी या प्रदर्शनात येण्याचे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ही जी तांब्या पितळेची जुनी भांडी,उपकरणे इ.अजून मिळत असून त्यांचा संग्रह मी करणार आहे आणि वेळोवेळी त्यांचे प्रदर्शन व विक्रीचा उपक्रम सतत राबविण्यात येणार आहे. त्याचा दिवस व वेळ ठरविल्यावर सांगण्यात येणार स्वावलंबन केंद्राचे विद्यार्थी कापडी पिशव्या शिवतात व ना नफा व ना तोटा या तत्वावर विकतात. वरील प्रदर्शनात कापडी पिशव्यांचे प्रदर्शन व विक्री होईल तरी कृपया सर्वानी या कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करावी असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.फ्रेंड्स स्वावलंबन केंद्र ,श्री शिवप्रसाद सोसायटी ,डाँ.राजेंद्रप्रसाद रोड ,टिळकनगर, अमृत हॉस्पिटल जवळ ,डोंबिवली (पूर्व ) येथे सदर प्रदर्शन व विक्री दिनांक ११ मार्च ते २२ मार्च दरम्यान सकाळी १०.०० ते १.०० व संध्याकाळी ५.०० ते ९.०० या वेळेत संपन्न होणार आहे.अधिक माहितीसाठी ९८६९९२१३१७/९९३०८९५६२५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन रोहित पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.