फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी (फॅन्स) च्या वतीने 26/11 स्मृतीदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री

(महेश शर्मा)

फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी (फॅन्स) च्या वतीने मुंबई येथे आज सकाळी 26/11 स्मृतीदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री हंसराज अहिर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 9/11 चा हल्ला हा जगाच्या आर्थिक साम्राज्यावरचा हल्ला होता, तर 26/11 चा हल्ला भारतीय अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याच्या करण्याच्या हेतूने होता. पण वेळोवेळी आम्ही हे सिद्ध केले आहे की, आम्ही संघर्षशील आहोत आणि अशा प्रत्येक हल्ल्यात आम्ही शत्रूला परास्त केले आहे. आपल्या सरकारने फोर्सवन आणि सीसीटीव्ही जाळे भक्कम करणे यासारखे अनेक उपाय केले, जे 2008 पासून प्रलंबित होते. मासेमारीसाठी वापरल्या जाणा-या नौकांचे कलर कोडिंग, बुलेटप्रूफ जॅकेट्स, सुरक्षिततेसाठी समन्वय यंत्रणा आणि स्थानीय लोकांचे प्रशिक्षिण असेही अनेक उपाय करण्यात आले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email