फेसबुक फ्रेंडला भेटायला गेलेल्या युवतीची हत्या
नालासोपारा – आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटायला गेलेल्या युवतीची हत्या झाल्याची घटना नुकतीच उघडकीला आलीय.याप्रकरणी तुळींज पोलिसांनी मृत युवतीच्या त्या खुनी मित्राला अटक केली आहे.वाशीला राहणारी एक २० वर्षीय युवती व हरिदास निरगुडे यांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. या मैत्रीतून ती निरगुडेला भेटायला नालासोपारा येथे त्याच्या घरी गेली.परंतु त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधांसाठी मागणी केली तिने त्या गोष्टीला नकार देताच संतापलेल्या हरिदास निरगुडे याने तिची हत्या केली.यानंतर त्याने तिचा मृतदेह इमारतीच्या जिन्यावर टाकुन दिला.इमारतीतील एका रहिवाशाने सदर मृतदेह पहिल्याने त्याने पोलिसांना कळवले.इमारतीतील काहींनी तिला त्या फ्लॅटमध्ये शिरताना पाहिलं होतं.या आधरे पोलिसांनी तपास केला.पोलिसांना निरगुडेच्या घरातील बेडवर रक्ताचे डाग आढळले तसेच युवतीचा मोबाईल व पर्सही तेथे आढळली. निरगुडेने बुटाच्या लेसने तिचा गळा आवळला होता. ‘शारीरिक संबंधांसाठी तिनं नकार दिल्याने तिला ठार केलं,’ अशी कबुली निरगुडेनं तुळींज पोलिसांना दिली आहे.