फेसबुकवरून डेटा चोरणारी कंपनी : केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीचं कामकाज लवकरच होणार बंद

लंडन :०३ मे फेसबुक डेटा चोरी प्रकरणातली मुख्य आरोपी कंपनी केंब्रिज अॅनालिटिका लवकरच बंद होणार आहे. कंपनीनं अधिकृतरित्या दिवाळखोरी जाहीर केलीय. आम्ही आता व्यवसाय करु शकत नाही. असही कंपनीने जाहीर केले आहे. कंपनी बंद झाल्यावरही आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत राहू, असं कंपनीनं म्हटलंय.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीवर फेसबुकच्या कोट्यवधी लोकांचा व्यक्तीगत डेटा चोरी करुन त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.डेटा चोरी प्रकरणामुळे कंपनीची बदनामी झाली. आणि त्यामुळे आम्हाला ग्राहक मिळत नाहीयेत, असा कांगावा करायलाही कंपनीनं सुरुवात केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे.केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म आहे.अमेरिकेचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता.

केम्ब्रिज अॅनालिटिका ही ब्रिटनस्थित कंपनी आहे. या कंपनीमुळेच फेसबुकवरील युजर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.फेबसुकच्या प्रवकत्याकडून सांगण्यात आलं की, ‘हा निर्णय डेटा लिक प्रकरणाचा आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज बंद होणं हे ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे. ग्राहकांच्या विश्वासावर आणि आमच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम होणार आहे.’

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email