फेरीवाला सर्वेक्षणात भष्ट्राचाराचा आरोप; प्रभाग क्षेत्र समितीच्या सभेत नगरसेवक आक्रमक
डोंबिवली – फेरीवाला हा प्रश्न गंभीर होत असताना त्यात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. फेरीवाला सर्वेक्षणात मोठा भष्ट्राचार होत असल्याचा आरोप गुरुवारी डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात पार पडलेल्या प्रभाग क्षेत्र समितीच्या सभेत सभापती खुशबू चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे डोंबिवलीत फेरीवाल्यांची संख्या वाढणार असून आधीच्या फेरीवाल्यांना जागा देण्याचा प्रश्न असताना नवीन फेरीवाल्यांना जागा कुठे जागा देणार असा प्रश्न नगरसेवकांनी सभेत उपस्थित केला. त्यामुळे आता पालिका आयुक्त यात काय निर्णय घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे स्टेशनपरिसरात पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांनी बसण्यास सुरुवात केली असता दुसरीकडे मात्र प्रभाग क्षेत्र अधिकारी कारवाई करत असल्याचे ठामपणे सांगत आहे. याला आक्षेप घेत फेरीवाला सर्वेक्षणाचे अर्ज एका दुकानात विकत मिळत असून त्यात भष्ट्राचार होत असल्याचा आरोप प्रभाग क्षेत्र समितीच्या सभेत सभापती चौधरी यांनी केला. `फ़` प्रभाग क्षेत्र अधिकारी अमित पंडित यांनी यावर फेरीवाला सर्वेक्षणात कोणताही भष्ट्राचार झाला नसून फेरीवाल्याच्या सर्वेक्षणाच्या अर्जावर तपासणी होणार असल्याचे सांगितले. यावर सभेत उपस्थित नगरसेवक निलेश म्हात्रे , संदीप पुराणिक , राजन आभाळे , साई शेलार आणि नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी आक्षेप घेतला. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाल्यांनी विळखा घातला असून पालिका प्रशासन त्यांना मोकळे रान देत असल्याचा आरोप नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सभेत केला असता प्रभाग क्षेत्र अधिकारी पंडित यांनी दररोज कारवाई होत असल्याचे उत्तर दिले. मात्र फेरीवाल्यांवर कारवाई होत नसून अधिकारी फेरीवाल्यांकडून कलेक्शन करत असतात असा आरोप नगरसेवक विश्वदीप पवार, राजन आभाळे आणि निलेश म्हात्रे यांनी केला. आठवडा बाजार भरतो मात्र त्यानंतर कचरा आजूबाजूला फेकला जातो असे नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले.
पालिका आणि फेरीवाले म्हणजे टाॅम अॅड जेरी ……
स्टेशनपरिसरात बसत असलेल्या फेरीवाल्यांवर पालिका प्रशासन करत असलेली कारवाई म्हणजे टाॅम अॅड जेरीचा खेळ आहे अश्या शब्दात नगरसेवक संदीप पुराणिक यांनी खिल्ली उडवली.यावर उपस्थित नगरसेवकांनी होकार देत पालिकेच्या कारवाईवर नागरिक नाराज असल्याचे सांगितले.
नगरसेवकांच्या पत्राला केराची टोपली …..
पालिकेच्या अनेक विभागात नगरसेवक पत्र देत असून त्यांना उत्तरे दिली जात नाही असे नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सभेत केला. काही दिवसांपूर्वी नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे पत्र दिले होते. अद्याप यावर उत्तर देण्यात का आले नाही असे नगरसेविका चौधरी यांनी टेंगळे यांना जाब विचारला. यावर टेंगळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही असे चौधरी यांनी सांगितले.