फसवणूकीचा जाब विचारण्या-या प्रेयसीला मारहाण करत केला बलात्काराचा प्रयत्न;डोंबिवलीतील घटना 

पाच दिवस घरात डांबून ठेवले,वाच्यता केल्यास लहान बहिणीला पळवून नेण्याची दिली धमकी

(श्रीराम कांदु)
डोंबिवली –  प्रियकराचे दुसऱ्या मुली सोबत प्रेम सबंध असल्याचे माहिती पडल्याने जाब विचारण्यास गेलेल्या तरुणीला प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने बेदम मारहाण केली तसेच या दोघांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला मात्र तिने आरडाओरड करत विरोध केल्याने या दोघांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच आपल्या काही महिला साथीदाराना बोलावुन पीडित तरुणी बदनामी करत असल्याचे खोटे सांगून मारहाण करत तिच्याच राहत्या घरात डांबून ठेवले तसेच या बाबत कुठे वाच्यता केल्यास लहान बहिणीला पळवून नेऊ अशी धमकी दिल्याचा प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे.या प्रकरणी सदर पीडित तरुणीने मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी शांतनू फारणे, करण,अंजली,रिया ,गौरी या पाच जणा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. 
       डोंबिवली मानपाडा परिसरात राहणाऱ्या सदर पीडित तरुणीचे शांतनू फरणे या तरुणाशी प्रेमसंबंध होते.शांतनू ने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शरीर सबंध प्रस्थापित केले होते.दरम्यान या पीडित तरुणीला शांतनू चे एका मुलीसोबत प्रेमसबंध असल्याचे कळाले .तिने याबाबत आपल्या मित्रांना सांगितले .ही बाब शांतनूला कळताच तो संतापला शांतनू आपला मित्र करणंला घेऊन पीडित मुलीच्या घरी आला त्याने व त्याचा मित्राने पीडित तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तरुणीचे कपडे फाडत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला .मात्र पीडितेने प्रतिकार करत आरडाओरड केल्याने शांतनू व त्याचा मित्र करणं घाबरले त्यांनी त्यांच्या ओळखीचे जवळच राहत असलेले अंजली,गौरी ,व रिया याना बोलवले व त्यांना सदर पीडित तरुणी आपल्यावर खोटे नाटे आरोप करत असल्याचा आरोप केला व या पीडितेल सर्वांनी मारहाण करत तिला तिच्याच घरात पाच दिवस डांबून ठेवले .तसेच याबाबत कुठे तक्रार केलीस करत तुझ्या लहान बहिणीला पळवून नेण्याची धमकी दिली .अखेर त्रस्त या पीडित तरुणीने मानपाडा पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी शांतनू फारणे, करण,अंजली,रिया ,गौरी या पाच जणांं विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email