फक्त विरोधा साठी मोदी विरोधक सक्रिय !

(कर्ण हिंदुस्थानी )
ज्या व्यक्तीला देशाच्या बहुसंख्य लोकांनी आपला अमूल्य मत देऊन पंतप्रधान बनवला आहे , त्या व्यक्तीचा विरोधक फक्त या कारणां मुळे विरोध करताहेत कारण ते विरोधक आहेत . विरोध करणाऱ्यांनी असा विचार कधी केलाच नाही की ते मोदी विरोधी भूमिका घेऊन फक्त मोदींचा नाही तर देशाच्या लोकतंत्र प्रणालीचाच विरोध करीत आहेत . मोदी च्या तीन वर्षाच्या कार्यकाळात एक ही घोटाळा कुणाला दिसला नाही . विकास कार्य निरंतर सुरु आहेत , खेड्यापाड्यात वीज पहुंचायला लागली आहे , मुद्रा योजना , सौभाग्य योजना , उज्जवला योजना आणि इतर योजनांच्या माध्यमां तून गोर गरीब जनतेला मोदी सरकार मुख्य धारा मध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहे , त्या मुळे विरोधक चिढले आहेत . जर मोदींनीं जनतेला सोयी सुविधा दिल्या तर पुढच्या वीस पंचवीस वर्षात लोक आम्हाला विसरून जातील . मग आम्ही काय रस्त्यावर भीक मागायची ? कधी चाय वाला , कधी फेकू , कधी विदेशात नेहमी फिरणारा , कधी स्वतःच्या बायको ला सोडणारा आणि कधी तर देशा साठी धोका आहे मोदी असे संबोधन करण्यात विरोधक मागे पुढे बघत नाही . विरोधी पक्षांना हे कळत नाही की देशाच्या भल्या साठी मोदी २४ तासातून १८ तास काम करताहेत . देश चा विकास कसा होईल त्या साठी मोदी आपला घर सोडून काम करताहेत . देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती कशी होईल या साठी सर्व काही प्रयत्न करण्यात मोदी व्यस्त आहेत . टीका करणाऱ्यानी टीका कराव्यात पण त्या टीकेचा काही अर्थ तरी असले पाहिजे के नाही . स्वातंत्र्या पासून आता पर्यन्त देशाच्या शहरी भाग विकसित होत गेला पण ग्रामीण भाग जसा होता तसा आज ही आहे . त्या मुळे शहरी भाग वर ताण वाढतच आहे , विकास कार्य खेड्यापाड्यात पोहोचलाच नाहीं . सादी  वीज सुद्धा देता आली नाही . शेती साठी पाणी नाही , शेतकऱ्याना पीक नाही , कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकर्याना बॅंका कडून कमी तर साहुकारांकडून जास्त कर्ज उपलब्ध करून दिला गेला . नंतर कर्ज ना फेडू शकल्याने शेतकरी आत्म हत्या करू लागले . अश्या वेळी जेव्हां निवणुकीत मोदी सारखा देशा साठी लढणारा व्यक्ती पूर्ण बहुमताने लोकसभेत बसतो त्या वेळी विरोधक हे मान्य करीत नाही की जनतेने आम्हाला आमच्या कर्मा मुळे सत्तेतून बेदखल केले आहे . उलट मोदी विरोध करून आपली अक्कल विरोधक प्रदर्शित करीत आहेत . विरोधक कसा असावा याचा उदाहरण जर बघायचा असेल तर अटल बिहारी वाजपेई कडे बघावे , ज्यांनी बांगलादेश निर्मिती नंतर इंदिरा गांधींना दुर्गा ची उपाधी देऊन त्यांचा भर लोकसभेत गौरव केला होता . म्हणून बोलतोय फक्त विरोधा साठी विरोध करू नये , काही तरी तथ्य समोर असणे गरजेचा आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email