प्लॅट देण्याचे आमिष दाखवून पाच लाखाना गंडा
कल्याण – प्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका इसमाला पाच लाखांना गंडा घातल्याची घटना कल्याणात उजेडात आली आहे. सुनील हसे असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून ते मुंबई भायखळा येथे राहतात .दोन वर्षापूर्वी कल्याण मध्ये राहणारा शशिकांत शेलार याने हसे यांना आधारवाडी योगेश्वर अपार्टमेंट मध्ये प्लॅट घेवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रुपये चेक द्वारे घेतले .मात्र दोन वर्ष लोटूनही प्लॅट न मिळाल्याने हसे यांनि शेलारला जाब विचारला त्यामुळे संतापेल्या शेलारने त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हसे यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी शेलार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: