प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे दहा हजार रुपयांची चिल्लर देऊन हा दंड भरला
नाशिक – सिन्नर फाटा येथील एका वाइन शॉपच्या मालकाला प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे दहा हजाराचा आर्थिक दंड आकारण्यात आला होता. पण वाइन शॉपच्या मालकानी अक्षरश दहा हजार रुपयांची चिल्लर देऊन हा दंड भरला. एक आणि दोन रुपयांची नाणी मोजताना या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी अक्षरश: रडकुंडीला आले होते. या दुकानदारास पालिका अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा दंड ठोठावला आहे.
Please follow and like us: