प्रियकरासह लिव -इन-रिलेशन मधे रहण्या-या मुलीचे पित्याने तुकडेतुकडे करुन चौकात टाकले
लुधियाना-पंजाब येथील लुधियानातील एका पित्याने आपली मुलगी व तिच्या प्रियकराची ह्त्या केल्याची घटना घडली आहे.सदर मुलगी आपल्या पतीला सोडून प्रियाकराबरोबर राहत होती.या हत्येनंतर तिच्या पित्याने शावाचे तुकडेतुकडे करुन चौकात टाकले.या घटने नंतर त्या जिल्ह्यात एकच खळबळ माजली.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
स्थानीय सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीची मुलगी आपल्या प्रेमी बरोबर लिव -इन-रिलेशन मधे राहत होती.तिच्या या वागाण्याबद्दल त्यांच्या कुटुंबात नाराजी होती. पोलिसांच्या माहिती नुसार कूमकलां विभागातील गुरमेल सिंह याची मुलगी बलजीत कौर (35) व कुलदीप सिंह (37) यांचे चार वर्षांपासून प्रेम संबंध होते.बलजीत कौर विवाहित असून गेल्या एका वर्षापासून पतीला सोडून प्रियकराबरोबर लिव इन मधे राहत होती.याला तिच्या वडिलांचा विरोध होता.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की आरोपी पित्याने सुनोयोजित प्रकारे हत्येचा कट रचला. रात्री बलजीत कौरच्या घरी जावून तेथे जेवण केले व रात्री तेथेच राहिले.रात्री उशिरा बलजीत कौर व कुलदीप सिंह यांची हत्या केली.या हत्येनंतर तिच्या पित्याने शावाचे तुकडे करुन चौकात टाकले.