प्रियकराचा सहा वर्षांने मोठ्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार,उल्हासनगरची घटना
सहा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रेयसीवर प्रियकरानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या नराधमाने पीडितेला प्रेमजाळ्यात अडकवले. प्रेमाचे सूत जुळल्यावर तिला लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. अत्याचारामुळे पीडिता गरोदर राहिल्याने तिला गर्भपात करण्यासही या नराधमाने भाग पाडले.
गर्भपात केल्यानंतर पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच पीडितेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून प्रियकराच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. रवी भगत (वय-२२), असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नराधम रवी हा कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात राहतो. गेल्या तीन वर्षापूर्वी त्याने त्याच्यापेक्षा वयाने ६ वर्षांनी मोठ्या असलेल्या पीडितेला माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे बोलून तिला आपल्या प्रेमजाळ्यात अडकवले. तब्बल ३ वर्ष तिच्याशी प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी उल्हासनगरातील कॅम्प नं. १ परिसरात असणाऱ्या लॉजवर नेत वारंवार लैंगिक अत्याचार केला. अत्याचारामुळे ती गरोदर राहताच तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता रवीने उडवाउडवीची उत्तरे देत तिच्याशी लग्न करण्यास नकार देत तिची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे समजताच पीडितेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेत रवी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी रवीला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Sources – ABI News