“प्राथमिक आरोग्य सेवा” या विषयाबाबतच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला जे पी नड्डा यांनी केले संबोधन
नवी दिल्ली, दि.२६ – सामाजिक आणि पर्यावरणविषयक मानक साध्य करण्यासाठी बहु क्षेत्रीय कृती महत्वपूर्ण आहे, असे सांगून पोषण, पेयजल आणि स्वच्छता, शिक्षण, ग्रामीण आणि नागरी विकास यासारख्या क्षेत्रात सामाईक उदिृष्ट साध्य करण्यासाठी कार्यान्वयन धोरण विकसित केल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितले. सार्वत्रिक आरोग्य आणि शाश्वत विकास उदिृष्ट या लक्ष्यांसंदर्भात प्राथमिक आरोग्य सेवा याबाबतच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कझाकिस्तानमधल्या अस्ताना इथे ते आज बोलत होते. भारतात प्राथमिक आरोग्य सेवांची व्यापकता वाढवण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. माता आणि नवजात शिशू, पोषण, बाल आरोग्य विषयक सेवा बळकट केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या “आयुष्मान भारत” या महत्वाकांक्षी उपक्रमाविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली.