प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजत केला विनयभंग

डोंबिवली दि.११ – एका प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजत तिचे अर्धनग्न फोटो काढून तिचा विनयभंग करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिला या फोटो च्या आधारे ब्लक मेल करत तिच्या मैत्रीनला बोलवण्यासाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात उजेडात आला आहे. या प्रकरणी पिडीत मुलीने बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी कुलदीप सागर या वासनांध प्रशिक्षका विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

सदर पिडीत तरुणी कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रोड सिंडीकेट परिसरात राहता असून काही महिन्यांपूर्व ईटी आपल्या आई बरोबर मोहिंदरसिंग काबुल सिंग येथील ग्राउंड मध्ये गेली होती. यावेळी त्यांना कुलदीप हा प्रशिक्षक भेटला त्याने पिडीत मुलीच्या आईला डोंबिवलीत लहान मुलाच्या स्केटिंग च्या स्पर्धा असल्याचे सांगत तिच्या आईला सांगून तो पिडीतेला त्याच्या दुचाकीवर बसवून डोंबिवली येथे घेवून गेला .याच दरम्यान पिडीतेला तहान लागल्याने तिने पाणी मागितले असता या वासनांध कुलदीप ने तिला ज्यूस पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये नेले व त्या ज्यूस मध्ये गुंगीचे औषध टाकून तिला पाजले. ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिचे अर्धनग्न फोटो काढत तिचा विनयभंग करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्यानंतर त्याने पिडीतेला ब्लकमेल करत तुझ्या मैत्रिणीला बोलव नाही तर तुझी वाट लावेन व तुझ्या घरातल्यांना मारून टाकेन अशी धमकी दिली. या जाचाला कंटाळून या पिडीतेने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितलं. या प्रकरणी सदर पिडीत तरुणीने बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी वासनांध नराधम प्रशिक्षक कुलदीप सागर विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email