पोहोण्यासाठी समुद्रात उतरलेले पाच तरुण बुडाले त्यापैकी एकाला वाचवण्यात यश
मुंबई दि.०६ – पावसाळ्यात समुद्र जास्त खवळलेला असतो, त्यामुळे समुद्रात पोहोयला जाणं धोकादायक असतं. त्याबाबतच्या सूचना प्रशासन वारंवार देत असतं त्याकडे दुर्लक्ष करून पाच तरुण पोहोण्यासाठी समुद्रात उतरले असता लाटांचा जोर जास्त असल्यानं हे पाचही तरुण खोल समुद्रात ओढले गेले. त्या पाच तरूणांपैकी फक्त एकाला वाचवण्यात यश आलं. तर इतर चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. जुहू चौपाटीवर संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून १८ ते २० वयोगटाते हे सगळे तरूण होते. हे सर्व तरुण डीएननगरचे रहिवासी आहेत.
Please follow and like us: