पोहायला गेलेले ३ जण बुडाले
रायगड – कोपरखैरणे येथून अलीबाग येथील नागाव येथे फिरायला गेलेल्या ग्रुपमधील ३ जण बुडाल्याची घटना घडली आहे.यातील दोन जणांचे मृतदेह सापडले असून तीस-या व्यक्तीचा शोध सुरु आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील 13 जणांचा एक ग्रुप शुक्रवारी अलिबाग येथे फिरायला गेला होता. अलिबागच्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात पोहण्यासाठी गेले असता या ग्रुपमधील तीन जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. बुडालेल्यांंपैकी दोन जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं असून एकाचा शोध सुरु आहे. सुहाद सिद्दीकी (21 )आणि आशिष रामणारायन मिश्रा (20 )या दोघांचे मृतदेह सापडले असून सायंकाळपर्यंत चैतन्य किरण सुळे याचा शोध सुरु होता.
Please follow and like us: