पोलीस दलातील हुतात्म्यांना राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे आदरांजली
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे महासंचालक आर.के.पंचनंदा यांनी पोलीस दलातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. भारत-तिबेट सीमा पोलिसांनी ‘हुतात्म्यांना अभिवादन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारत-तिबेट सीमा पोलीस दलातर्फे संचलनही करण्यात आले आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महिला कमांडो पथक, स्कीइंग पथक, पोलीस पथक आणि पॅरा ट्रुपर्सनीं संचलनाच्या माध्यमातून स्मृती स्मारकाला आदरांजली अर्पण केली. महिला बॅन्डने यावेळी विशेष सादरीकरण केले. “अबाइड विथ मी” च्या सुरांनी कार्यक्रमाची सांगता झाली. भारत-तिबेट पोलीस दल हिमालयाच्या खडतर सीमेचे संरक्षण करते. या दलाच्या स्थापनेला नुकतीच 56 वर्षे पूर्ण झाली.
Please follow and like us: