पोलीस कर्मचा-याला २०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
ठाणे लाचलुचपत खात्याने प्रतिबंधक ठाणे वाहतुक शाखेत कार्यरत असणा-या पोलीस कर्मचा-याला २०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. कोपरी येथील वाहतुक नियंत्रण कार्यालयात कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचा-याचे नाव नितिन वामन कामठे असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे हेलमेट नसल्याने त्यांचे लाइसेंस जमा होते सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या कडून कामठे यानी ५०० रूपये मागितले होते.परंतु हेलमेट नसल्याचा दंड ३०० रुपये असल्याने फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. कामठे याना पावतीपेक्षा अधिक २०० रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.
Please follow and like us: