पोलीस असल्याची बतावणी करत रोकड सह मोबाईल केला लंपास व् अन्य कल्याण डोम्बिवली अपराध वृत्त

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये वाढत असलेला भुरट्या चोरट्यांचा वावर नागरिकांसह पोलीस यंत्रणेची डोकेदुखी ठरू लागला आहे .त्यातच काल पोलीस असल्याची बतावणी करत दोन भामट्याने तिघा तरूनकडून रोकड व मोबाईल असा मिळून २९ हजारांचा मुद्देमाल केला आहे .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरात राहणारा जितेंद्र चौहान आपल्या दोन मित्रांसह काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील शिवाजी चौक परिसरातील एका बँकेत जात होते . यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्यांना हटक्ले पोलीस असल्याची बतावणी करत झडती घेण्याचा बहाणा करत या तरुणांजवळील रोकड व मोबाईल हिसकवून घेत तेथून पल काढला .या प्रकरणी सदर तरुणांनी मानपाडा पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .

गरबा खेळताना बाहेर काढल्याचा राग मनात धरून मारहाण

कल्याण : नवरात्रोउत्सवादरम्यान गरबा खेळत असताना  बाहेर काढल्याने संतापेल्या चार तरुणांनी बाहेर काढणाऱ्या इसमावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कल्याण पश्चिम लोकधारा संकुलात घडली आहे .

कल्याण पूर्वेकडील आत्माराम नगर लोकग्राम आत्माराम भोईर बंगल्यात राहणारे सुरज भोईर यांनी नवरात्र उत्सावादरम्यान चार अनोळखी तरुणांना सोसायटी मध्ये सुरु असलेल्या गरबा खेळत असताना बाहेर काढले होते .याचा राग मनात धरून या तरुणांनी काल रात्री नवू वाजण्याच्या सुमारास या परिसरातील ग्लोबल स्कूल जवळ गाठत त्याच्यावर धारदार शास्त्राने पोटावर वार करत तेथून पळ काढला या हल्ल्यात भोईर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणी सुरज भोईर यांनी कोल्शेवाडी पोलीस स्थानाकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

बोगस कागदपत्रा च्या आधारे कर्ज घेवून फायनान्स कंपनीला लाखोंचा गंडा

कल्याण : एका नामांकित फायनान्स कंपनीला ग्राहकांचे बनावट कागदपत्र सादर करत तब्बल २१ लाख ३६ हजार ३५ रुपयांचे कर्ज घेवून कंपनीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये उघडकीस आली आहे या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात सुरेश बाबू नायर ,सुनील नायर ,प्राची मेढेकर ,संदेश साळुंखे ,अविनाश कुरतडकर या पाच जना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु केला आहे .

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात असलेल्या एका नामंकित फायनन्स कंपनी मध्ये असलेल्या ८२ कर्जदारापैकी काही कर्जदारांचे बनावट कागदपत्रे व बँक खाते उघडून कंपनीस सादर करून तय आधारे तब्बल २१ लाख ३६ हजार ३५ रुपयांचे कर्ज मंजूर करून घेत या रक्मेचा अपहार करण्यात आला होता हि बाब लक्षात आल्याने या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी स्थानकात सुरेश बाबू नायर ,सुनील नायर ,प्राची मेढेकर ,संदेश साळुंखे ,अविनाश कुरतडकर या पाच जना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु केला आहे .

कल्यानात घरफोडी

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील सहजानंद चौक महाजन वाडी वेताळ वाडी परिसरात राहणारी वनिता कवटे या काल सकाळी राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने असे मिळून ४० हजारांचे दागिने लंपास केले .काही कालावधीने घरी परतल्यानंतर तिला घरात चोरी झाल्यचे लक्षात आले तिने या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरून केला आहे .

विक्री केलेल्या सिमकार्ड ची माहिती पोलीसन न दिल्याने दुकानदारां विरोधात गुन्हा दाखल

कल्याण : विक्री केलेल्या मोबाईल सिमकार्ड ची माहिती दुकानात नोंद करत ती पोलीस स्थानकाला देणे बंधनकारक असताना ती महिती पोलीसाना न दिल्याने सबंधित दुकानदारा विरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

कल्याण पश्चिमेकडील मिलिंद नगर गौरी पाडा परिसरात तेजस कॉलनी अयोध्या चालीत दयाराम रोमिना याचे भूमिका मोबाईल शोप आहे .सिमकार्ड विक्री केल्या नंतर त्यांची नोड दुकानातील रजिस्टर मध्ये करत हि माहिती स्थानक पोलीस स्थानाकला देणे आवश्यक असताना त्यांनी विक्री केलेल्या सिमकार्ड ची माहिती पोलीसान न दिल्याने पोलिसांनी दुकानमालक रोमिना विरोधात गुन्हा दाखल केला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email