पोलीस असल्याची बतावणी करत रिक्षा चालकाला लुबाडले

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील शेडा क्रॉस रोड येथे राहणारे रिक्षा चालक नागनाथ सरवदे काल रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमरास कल्याण पूर्वेकडील सूचक नाका येथून रिक्षाने जात असतांना लघवी करण्यासाठी खाली उतरले.यावेळी दोन इसम दुचाकीवरून आले त्यांमधील एकाने आपण पोलीस असल्याच्ची बतावणी करत हि लघवी करण्याची जागा आहे का असा सवाल तर रिक्षाचे कागदपत्र दाखवन्यास सांगीतले व जबरदस्तीने त्यांच्या खिशातील ३०० रुपये काढून तेथून पसार झाले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात अल्याने त्यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांंनी दत्तात्रय दगडू आहिरे याच्या सह त्याच्या साथीदार विरोधात गुन्हा दखल केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.