पोलिस आयुक्तालयानजीक शालेय विद्यार्थीनीवर ‘अॅसिड अटॅक’,एकतर्फी प्रेमातून हल्ला?
(म विजय )
-पिडिता ९ वी ची विद्यार्थीनी -एका संशयिताला अटक -एकतर्फी प्रेमातून हल्ला?
अमरावती : अमरावती शहर पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसंत हॉलनजीक आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका माथेफिरुने एका ९ व्या वर्गात शिकणा:या विद्यार्थीनीवर अॅसिडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याची बाब पून्हा एकदा सिद्ध झाली आहे. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली आहे. पिडित युवती फ्रेजरपुरा परिसरातील रहिवासी असून गल्र्स हायस्कुलची विद्यार्थीनी आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकतर्फी प्रेमातून हा अॅसिड हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. ९ व्या वर्गात शिकणारी ही युवती शाळा सुटल्यानंतर पायदळ मालटेकडी मार्गे आपल्या घरी जात असतांना वसंत हॉलसमोर बाईकवरुन आलेल्या तिघापैकी एका आरोपीने तिच्यावर अॅसिड फेकले व तिघेही फरार झाले. तिचा चेहरा, पाठ आणि हाताला दुखापत झाली. तिला तात्काळ इर्विनमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी फे्रजरपूरा भागातील रहिवासी असलेल्या सोनू मधुकर मेश्राम (१९) याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. तो निश्चित आरोपी आहे काय? याबाबत पोलिस चौकशी करीत आहे. अन्य दोघांचाही पोलिस शोध घेत आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.