पोलिसांनी जीव धोक्यात घालून आरोपीच्या आवळल्या मुसक्या
(म.विजय)
गेवराई – बीड -आरोपी, अट्टल गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आता प्राणघातक हल्ले होेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. मागील वर्षभरात जवळपास पाच पेक्षा जास्ता घटना घडल्याने पोलिसच असुरिक्षत झाले आहेत. असे असले तरी पोलिसांनी कर्तव्यात माघार न घेत आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. विशेष म्हणजे शिरूरमध्ये वाळू माफियांनी पोलिसांवर हल्ला केला होता.
तेलंगणा राज्यात चोरी करून गेवराईत आलेल्या अप्पु या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गेले होते. तेलंगणा पोलीसही सोबत होते. जुन्या बसस्थानक परिसरातील घराजवळ सापळा लावून त्याला पकडले. परंतु सराईत असलेल्या अप्पुने खिशातील चाकू काढून पोना गणेश तळेकर यांच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तळेकर यांनी तो वार आपल्या हातावर घेतला. यामध्ये हाताला पाच टाके पडले. वार अडविल्याने मोठा अनर्थ टळला. असे असले तरी कर्तव्यातून माघार न घेता अप्पुच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरोधात गेवराई ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आल्यावर अप्पुचा पोलीस भाषेत चांगलाच पाहुणचार झाला.
शिरुरमध्ये पोलीस ठाण्याचा पदभार सपोनि महेश टाक यांनी स्विकारला. आठवडा पूर्ण होताच एका जत्रेत महिलांना नाचविण्यावरून गावात वाद झाला. यामध्ये पोलिसांच्या वाहनांवर व पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये काही कर्मचारी जखमी झाले होते. सपोनि महेश टाक यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ फोर्स मागविला आणि प्रकरण हाताळले. त्यानंतर गुन्हा दाखल करून २२ जणांना ताब्यात घेतले होते. वाºयाच्या वेगाने येणारे दगड चुकवित पोलिसांनी हे प्रकरण निवळले होते. पोलीस निरीक्षक दर्जाचे हे पोलीस ठाणे टाक यांनी व्यवस्थीत सांभाळले आहे. तसेच पेट्रोलिंग दरम्यान, वाळूचे वाहन अडविले. याचवेळी वाळू माफियांनी बिभीषण गुजर या कर्मचाºयाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली. यामध्ये गुन्हा दाखल करून टाक यांनी तिघांना बेड्या ठोकल्या होत्या.
धारूरच्या प्रकरणात चौकशी
काही महिन्यांपूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपी धारूर तालुक्यातील गावंदरा येथे असल्याची माहिती होती. धारूर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व काही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांवर हल्ला करून हे आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दुसºया बाजुने पोलिसांच्या जाण्यावरच संशय व्यक्त करण्यात आला होता. संबंधितांनी वरिष्ठांना कल्पना न देता आणि संबंध नसताना आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर याची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती. मंदार नाईक यांच्याकडे ही चौकशी होती. नाईक यांनी मात्र याच्या अहवालाबाबत बोलण्यास तेव्हा टाळाटाळ केली होती.
गुन्हेगारी वस्तीवर जास्त धोका
जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी वस्त्या आहेत. या वस्त्यांवर अट्टल गुन्हेगार राहतात. त्यांना पकडण्यासाठी गेल्यावर पोलिसांना जीव मुठीत धरून जावे लागते. शस्त्र असले तरी कधी व केव्हा हल्ला होईल हे सांगता येत नाही. याच वस्त्यांवर जास्त धोका असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
चमकोगिरी करणा-यांवर हवा अंकुश
अनेक प्रकरणात काही अधिकारी केवळ चमकोगिरी करतात. त्यांच्या या चमकोगिरीमुळे खºया प्रकरणांवर सर्वसामान्यांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे या चमकोगिरीला अंकुश लावणे गरजेचे आहे. महिनाभरापूर्वीच असा एक प्रकार घडला होता. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कर्तव्याला सलाम
जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांसाठी दिवसरात्र बंदोबस्तावर असणाºया पोलिसांबद्दल सर्वसामान्यांमध्ये आदर आहे. तसेच गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेल्यावर जीव धोक्यात घालून त्यांना अटक केली जाते. स्वता:च्या जिवाची पर्वा केली जात नाही. त्यांच्या या कर्तव्यामुळेच जनता सुखी असते. म्हणून त्यांच्या या कर्तव्याला सलाम केला जात आहे.