पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हॉस्पिटलची तोडफोड….
इंडियन मेडिकल असोसिएशन मधील डॉक्टरांचा आरोप…..
४ तारखेपर्यंत सर्व आरोपींना अटक झाली नाही, तर कामबंद आंदोलनाचा इशारा .
(श्रीराम कांदु )
कल्याणच्या हॉलीक्रॉस हॉस्पिटलमध्ये झालेली तोडफोड पोलिसांच्याच हलगर्जीपणामुळे झाल्याचा थेट आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केलाय. होलीक्रॉस हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगवल्यानं सोमवारी सायंकाळी तुफान राडा झाला होता. यात हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर आणि पत्रकारांना जीवघेणी मारहाण करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने बैठक घेत या प्रकाराचा निषेध केला. शिवाय हा सगळा प्रकार पोलिसांच्याच हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत ४ तारखेपर्यंत सर्व आरोपींना अटक झाली नाही, तर कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Please follow and like us: