पोलिसांच्या कामात जमाव करत निर्माण केला अडथळा ; आरोपीला जमावाने केली पळायला मदत

कल्याण – नवी मुंबई पोलिसांचे पथक आंबिवली येथील इराणी वस्ती मध्ये दोन आरोपीना गुन्ह्याचा तपासासाठी ताब्यात घेण्यास आले असताना या आरोपीच्या आईने या वस्तीमधील काही जणांचा जमाव जमवून पोलिसांना रोखून धरत सदर आरोपीला पळवून लावल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात चार महिलांसह एका इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .जाहिदा ,फातिमा ,नादरा ,सुल्फिकार ,अली ,आरोपी जावेद सरवरची आई अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे .
    कल्याण नजीक आंबिवली रेल्वे स्थानकला लागून असलेल्या इराणी वस्तीत अनेकदा मातब्बर चोरट्यांना अटक करण्यात आली आहे अनेकदा अट्टल चोरट्यांचा शोध घेण्यासाठी या वस्तीत पोलिसांकडून कोम्बिग ऑपरेशन करत अनेक चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे दरम्यान पोलिसी कारवाई दरम्यान अनेकदा या वस्ती मधील जमावाने पोलिसांना प्रतिकार केल्याच्या घटना घडल्याने हि वस्ती नेहमीच संशयाच्या भोवर्यात राहिली आहे .शनिवारी रात्री च्या सुमारास अशीच एक घटना घडली    नवी मुंबई येथील पोलिसांचे पथक जोशी मार्ग पोलीस स्थानकात दाखल असलेल्या एक गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी जावे सरवर व सरवर अन्नू याचा याचा शोध घेण्यासाठी आंबिवली इराणी वस्तीत धडकले .पोलिसांकडून या आरोपींना स्थानिक पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत होते याच वेळी जावेद च्या आईने गोंधळ घालत जमाव जमवून पोलीसाना समोर गोंधळ घालत कारवाईत अडथला निर्माण केला या संधी चा फायदा घेत हे दोन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले .पोलिसांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात जाहिदा ,फातिमा ,नादरा ,सुल्फिकार ,अली ,आरोपी जावेद सरवरची आई विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email