पॉलीसी एजेंट ने पॉलीसी धारकाला २५ हजरांना गंडवले
डोंबिवली, दि. २१ – डोंबिवली पुर्वेकडील कर्वे रोड राहुल सोसायटी मध्ये शिक्षिका वंदना बेनके या शिक्षिकेने एका इन्शुरन्स कंपनीची पॉलीसी एका रजनीश तिवारी नावाच्या एजंट कडून घेतली होती.या पोलिसिचा हप्ता २५ हजार २१ रुपये त्यांनी तिवारीला देवू केले होते मात्र तिवारीने या कंपनीमधून नोकरी सोडल्या नंतर हि रक्कम भरली नाही सदर बाब बेनके यांच्या निदर्शनास येताच त्यांणा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी रजनीश तिवारी विरोधात विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखळ केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी तिवारी विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.