पॉलीश करण्याकरता दागिने घेवुन घेऊन पसार झालेल्यांना अटक,लाखोंचा माल हस्तगत

मुंबई –  कल्याण सुकुमार कर वय ३७ वर्षे यांनी त्यांच्या दुकानांमध्ये काम करणारा नोकर कार्तिक पायरा, वय २४ वर्ष याने एकूण किंमत ५७,६०,०००/-रुपये किंमतीची हिरेजडीत सोन्याचे दागिने पॉलीश करण्याकरता घेऊन गेला व त्यानंतर सदर मालमत्तेचा अपहार करून अज्ञात ठिकाणी पोबारा केला असल्याच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिस ठाणे गु.र.क्रमांक १०५/१८ कलम ४०८ भादवी अन्वये गुन्हा करण्यात आला होता.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून पायधुनी पोलिसांचे तपास पथक पश्चिम बंगाल या ठिकाणी रवाना झाले होते . सदर ठिकाणावरून गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कार्तिक पायरा वय २४ वर्षे यांच्यासह त्याचे  साथीदार  झारेश्वर सुधीर चंद्र मैती, वय ३६ वर्ष व पिंटू आदित्य भुया वय ३२ वर्ष यांना अटक करण्यात आली आहे. नमूद गुण्यातील आरोपींकडून एकूण किंमत रुपये ४९,२२,४०/- किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. आरोपांकडे केलेल्या तपासा दरम्यान झारेश्वर मैती याने अशा प्रकारचे अनेक गुन्हे मुंबई परिसरात केल्याची कबुली दिली आहे.नमूद गुह्यातील आरोपींना  न्यायालयाने दिनांक ४/६/१८ रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email