पैसे पडल्याची भूलथापा देऊन गाडीतील रोकड सह मोबाईल लंपास
डोंबिवली – तुमचे पैसे खाली पडले आहेत असे भुलथप देत एक चारचाकी गाडीत ठेवलेली १० हजार रुपये रोकड व ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल दुकलीने लंपास केल्याची घटना कल्याणात घडली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात दुकली विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात राहनरे अनंत रिजेन्सी मध्ये राहणर्या महिला सायली मांडवकर गुरुवारी रात्री साडे नउ वाजण्याच्या सुमारस कल्याण रेले स्थानक समोरील दीपक हॉटेल समोरील स्काय वॉक खाली आपल्या चार चाकी गाडीने मैत्रिणीस सोडण्यास आल्या होत्या .यावेळी अज्ञात इसमाने
त्यांना गाडीखाली पैसे पडले आहेत असे संगीतले त्यामुळे मांडवकर यांनी गाडी खाली उतरून पाहत असताना या इसमाचा सोबत असणाऱ्या इसमाने त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडत गाडीत ठेवलेली १० हजारांची रोकड व ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल उचलला व क्षणार्धात या दोघांनी तेथून पळ काढला ठोकली .या प्रकरणी मांडवकर यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुकलीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना मध्ये वाढ होत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत.