पेट्रोलियम कंपनीत नोकरी च्या आमिष दाखवत १२ जणांना एकूण १ लाख ६० हजारांना गंडवले
डोंबिवली दि.१० – पेट्रोलियम कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने तब्बल बारा जणांकडून मिळून १ लाख ६० हजारांना गंडा घातल्याची घटना कल्याण मध्ये उघडकीस आली आहे .या प्रकरणी अरविंद लाड या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण पूर्व विजय नगर परिसरात सुभम कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे रितेश साळवे यांच्यासह इतर ११ जणांना याच परिसरात राहणाऱ्या अरविद लाड या भामट्याने एका पेट्रोलियम कंपनीत नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवत त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. या आमिषाला बळी पडत या सगळ्यांनी त्याला एकूण १ लाख ६० हजार रुपये दिले मात्र पैसे देवून वर्ष भरच कालावधी लोटला मात्र नोकरी बाबात लाड उडवा उडवी ची उत्तरे देत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे साळवे यांच्या लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अरविद लाड विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .