पूर्वीच्या भांडनाच राग मनात धरून बेदम मारहाण – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.१५ – डोंबिवली पूर्वेकडील समता नगर आयरे गाव महालक्ष्मी चाळीत राहणारे भरत शेलार याचे याच परिसरात राहणाऱ्या दिनेश कदम याच्या सोबत काही दिवसापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून भरत रात्री सव्वा नवू वाजण्याच्या सुमारास कामावरून परतत असताना त्यांना घराच्या परिसारत अडवले व लोखंडी सळइ ने बेदम मारहान केली. या मारहाणीत भरत यांना दुखापत झाली असून त्यांनि या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी दिनेश कदम विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.